रयतच्या कालेतील महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काले ता. कराड येथील ग्रामस्थांना बरोबर घेऊन ४ आक्टोंबर १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू असून आज विद्यालयाचे बांधकाम प्रगतीकडे आहे.

रयतच्या कालेतील महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर
काले : येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे प्रगतीपथावर असलेले बांधकाम.

रयतच्या कालेतील महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर 

 

सुधारित प्लॅनसाठी संस्थेची अनूमती : अजूनही ७५ लाखाची गरज 

 

काले/प्रतिनिधी : 

 

          कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक स्वप्न पाहिले होते की, गोरगरिबांनच्या, बहुजनांच्या मुलांसह इतर समाजातील प्रत्येक मुलांना चांगले शिक्षण मिळावे. यासाठी कर्मवीर आण्णांनी काले ता. कराड येथील ग्रामस्थांना बरोबर घेऊन ४ आक्टोंबर १९१९ साली  रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू असून आज विद्यालयाचे बांधकाम प्रगतीकडे आहे. 

 

         काले ग्रामस्थांनी ३ वर्षांपूर्वी खा.राजू शेट्टी यांच्यासोबत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा.शरद  पवारसाहेबांना भेटून शाळेसाठी निधीची मागणी केली होती. काले ग्रामस्थ व खा. राजू शेट्टी यांची मागणी पवार साहेबांनी मान्य करत  राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून १ कोटी रूपये दिले. तसेच संस्थेच्या वतीने ५० लाख रूपये देण्यात आले आहेत. 

 

         दरम्यान, शरद पवार साहेबांनी काले ग्रामस्थांना २० लाख रुपये देणगी जमा करावी, असे सांगितले होते. तो शब्द  ग्रामस्थांनी पाळत आज रोजी २५ लाख ५० हजार रुपये देणगी स्वरुपात जमा केली आहे. 

 

         प्रस्तावित बांधकाम हे १ कोटी ७० लाख रुपयांचे होते. त्यामध्ये १२ वर्गखोल्या व विद्यार्थ्यांच्यासाठी स्वच्छतागृहे असा प्लॅन होता. परंतु, भविष्याचा विचार करता, तसेच विद्यार्थी संख्या लक्षात घेता अजून वर्गखोल्यांची गरज ओळखून रयत शिक्षण संस्थेने विद्यालयाच्या वाढीव कामासाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार सुधारीत प्लॅन वाढवला असून नूतन इमारतीच्या बांधकामासाठी अजून ७५ लाख रुपयांची गरज आहे. 

 

          त्यामुळे महाराष्ट्रातील रयत प्रेमी व दानशूर व्यक्तींनी रयत शिक्षण संस्थेच्या जन्मगावी सुरू असलेल्या विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी मदत करावी, असे आवाहन महात्मा गांधी विद्यालय माजी विद्यार्थी सेवा संघ काले यांच्या वतीने करण्यात आले आहे.