विरोधकांनी आमच्याच विकासकामांचे नारळ फोडले - आ. पृथ्वीराज चव्हाण

विरोधकांनी आमच्याच विकासकामांचे नारळ फोडले - आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधी : 

                        काले गावातील विकासासाठी मी मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत केलेल्या कामांचे व त्यासाठीच्या पाठपुराव्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. ते कधीही मी जनतेला बघायला देतो. परंतु विरोधकांनी आमच्याच विकासकामांचे नारळ फोडले, याचेच विशेष वाटते. त्यांनी आमच्या कामाचे श्रेय घेवू नये, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 

                         काले (ता. कराड) येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली एकूण 11 कोटींची विकासकामे, दक्षिण मांड नदीवरील पुलाची पाहणी, तसेच मुस्लीम समाजाच्या बैठकप्रसंगी ते बोलत होते. 

                        यावेळी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, पैलवान नानासाहेब पाटील, जखिणवाडीचे सरपंच अॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, कृष्णराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. 

                       पैलवान नानासाहेब पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी आजपर्यंत दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय कधीच घेतलेले नाही. त्यांनी ज्या कामांसाठी पाठपुरावा केला, त्या कामांची मंजूरी, व त्याची प्रशासकीय मान्यता घेतल्यावरच ते कामाचे भूमिपूजन करतात. परंतु, पृथ्वीराजबाबांनी केलेल्या कामांचे नारळ फोडणारी भाजपची मंडळी जनतेच्या विश्वासास अपात्र आहेत, हे त्यांना येत्या निवडणूकीत समजेल. 

                       यावेळी मुस्लीम समाजबांधवांबरोबर झालेल्या बैठकीत काॅंग्रेसच्या पाठिशी एकमुखी राहणार असल्याची ग्वाही समाजाच्यावतीने देण्यात आली. कार्यक्रमास शंकर यादव, भगवान यादव, आनंदराव पाटील, प्रल्हाद पाटील, किरण पाटील, संतोष पाटील, युनूस मुल्ला, रमजान शेख, विकास देसाई, ग्रामपंचायत सदस्य अरुण यादव, इंद्रजीत गुरव, सौ. यादव, माणिक यादव, सतीश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.