कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उंब्रज येथे रक्तदान शिबीर

कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उंब्रज येथे रक्तदान शिबीर
कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उंब्रज येथे रक्तदान शिबीर

कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उंब्रज येथे रक्तदान शिबीर

उंब्रज/प्रतिनिधी


    उंब्रज ता. कराड येथील सामाजिक कार्यकर्ते व कै. रामचंद्र दि. जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दि. २५ रोजी उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिरात ५० होऊन अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले विशेषतः सामाजिक भान राखत महिलांनीही या शिबिरात सहभागी होत रक्तदान केले.
     उंब्रज येथील रोटरी क्लब, रामचंद्र जाधव चँरिटेबल ट्रस्ट,रोटरी सोशल फौंडेशन तसेच रोट्रक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  यानिमित्ताने रविवारी रामचंद्र कॉम्प्लेस उंब्रज येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी उंब्रज रोटरीचे अध्यक्ष इंजि.अजित जाधव, सचिव विनायक जाधव, नितीन पाटील, सत्वशील पाटील, विश्वनाथ केंजळे, युवराज नागे, वैद्य विवेक जोशी, महादेव करळे, इंजि.राजेंद्र सावंत, प्रवीण यादव, राजू रावळ, सुधाकर जाधव, प्रमोद शहा,डॉ. सुनिल कोडगुले, आनंदराव भिसे,साहेबराव कदम जिल्हा परिषद सदस्या सौ.विनिता पलंगे, संग्रामसिंह पलंगे उपस्थित होते. यावेळी विनायक जाधव म्हणाले, कमलाकर पाटील हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. वाढदिवसा निमित्ताने प्रतिवर्षी रक्तदान शिबिर, फळे वाटप, वृक्षारोपण तसेच गरजूंना मदत असे विविध उपक्रम राबवले जातात. वैद्य डॉक्टर विवेक जोशी यांनी कमलाकर पाटील यांच्या सामाजिक कार्य विषयी माहिती देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या