महिलेच्या हातावर वार करून दागिने केले लंपास,वाई येथील घटना

महिलेच्या हातावर वार करून दागिने केले लंपास,वाई येथील घटना

वाई / दौलतराव पिसाळ
 
वाई शहरातील रविवार पेठे लगत असणार्या सर्वानंद नगर मधील अज्ञात तिनं चोरट्यांनी प्रतिकार करणार्या महिलेच्या डाव्या हातावर चाकुचा वार करून 3 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याने वाई शहरात एकच खळबळ उडाली आहे 

सविस्तर वृत्त असे कि मंगळवारच्या मध्यरात्री रविवार पेठ लगत असणार्या सर्वानंद नगर मध्ये राहणार्या गौरी सूर्यकांत वंजारी या पती आणी दोन मुलांन सह राहण्यास आहेत काल रात्री नेहमी प्रमाणे पती सूर्यकांत वंजारी हे कामावर गेले पण ते गेल्यावर दरवाजाला आतुन कडी लावण्याचे राहुन गेल्याने मंगळवारच्या मध्यरात्री अज्ञात २४| २५ वयोगटातील  3 तरूणांनी घरात प्रवेश केला व झोपलेल्या गौरी वंजारी यांना ऊठवुन त्यांना दमदाटी करून त्यांच्या अंगावरील दागिने चोरट्यांनी मागितले त्यास विरोध केल्याने महिलेच्या हातावर धारदार चाकूने वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या तरीही चोरट्यांनी त्यांना कपाटांची  चावी मागितली पण चावी न दिल्याने अखेर चोरट्यांनी डप्लीकेट चावीने कपाट उघडुन त्यातील सोन्याचे दागिने मोबाईल रोख रकमे सह  असा ३ लाख रुपयांचा    मुद्दे माल लंपास करुन चोरटे पसार झाल्याने वाई शहरात खळबळ ऊडाली आहे  या गंभीर चोरीचा तपास कामासाठी एलसीबीचे पथक घटना स्थळावर दाखल झाले आहे