वाईत पोलिस पाटलासह  कुटुंबावर  प्राणघातक हल्यामुळे खळबळ  

वाईत पोलिस पाटलासह  कुटुंबावर  प्राणघातक हल्यामुळे खळबळ  

वाईत पोलिस पाटलासह  कुटुंबावर  प्राणघातक हल्यामुळे खळबळ  

वाई / दौलतराव पिसाळ 

वाई तालुक्यातील मुंगसेवाडीचे पोलिस पाटील त्यांची पत्नी आणी चुलते यांना लोखंडी सळई लोखंडी  रॉड व हातोड्याने  त्याच गावातील सुरज बापुराव कासुर्डे किरण बापुराव कासुर्डे बापुराव साहेबराव कासुर्डे व आशा बापुराव कासुर्डे या चौघांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून प्राणघातक हल्ला केल्याने वाई तालुक्यातील पोलिस पाटलांन मध्ये  खळबळ ऊडाली आहे.वाई पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत 

 


सविस्तर वृत्त असे कि वाई तालुक्यातील मुंगसेवाडी या गावचे सरपंच विशाल रामचंद्र सुळके ग्राम पंचायतीचे सदस्य शंकर तानाजी वरे नामदेव शांताराम निकम शशिकांत गुलाबराव घाडगे गावचे पोलिस पाटील दिपक बबन निकम असे सर्वजन मुंगसेवाडी गावातील ओढ्याच्या पुला जवळ गटारामध्ये असणार्या पाईप मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला  असल्या मुळे तो कचरा कळकाच्या साह्याने बाहेर काढण्याचे काम सुरु असताना विठ्ठल बापुराव कासुर्डे हा स्वताची चारचाकी गाडी घेऊन जात असताना त्याला सांगितले कि या ठिकाणी गटाराचे काम चालू आहे हे संपे पर्यंत गाडी या रस्त्यावरुन आणु नको याचा राग व पुर्वीचा राग मनात धरून विठ्ठल बापुराव  कासुर्डे याने मनात धरून तो लगेच त्याच रस्त्यावरुन आला त्या वेळी त्याने भाऊ किरण बापुराव कासुर्डे याला  हातात लोखंडी बार घेऊन सोबत आणला होता तर वडील बापुराव कासुर्डे हेही हातात काठी घेऊन घटना स्थळावर दाखल झाले त्या वेळी गावचे सरपंच विशाल सुळके व ईतर ऊपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांन समोरच गावचे पोलिस पाटील असलेले दिपक बबन निकम यांच्या बरोबर बा चा बाची करु लागले पुढे या बाचाबाचीचे रुपांतर तुंब्बळ  हाणा मारीत झाल्याने  त्यात पोलिस पाटील यांचे चुलते दिलिप नारायण निकम वय ६० यांच्या डोक्यात लोखंडी बार घातल्याने ते गंभीर जखमी होऊन त्यांना पाच टाके पडले आहेत तर पोलिस पाटील दिपक बबन निकम आणी त्यांची पत्नी रेश्मा हे दोघेही जखमी झाले आहेत पोलिस पाटील कुटुंबा वर 
पुर्व नियोजीत झालेल्या या प्राणघातक  हल्या मुळे वाई तालुक्यातील पोलिस पाटलांन मध्ये खळबळ उडाली आहे वाई पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत तर वाई तालुका पोलिस पाटील संघटनेने या भ्याड हल्याचा निषेध केला आहे