आराेपी खाेटे बाेलत आहे असे सांगणारे एआय तंत्रज्ञान स्टार्टअपने केले तयार; ब्रिटन, भारतात चाचणी हाेणार

लंडन - आराेपी खरे बाेलत आहे की खाेटे याचा पत्ता लावणे पाेलिसांसाठी सर्वात कठीण असते. परंतु याला साेपे करण्यासाठी ब्रिटनच्या एका स्टार्टअप फेससाॅफ्टने एक अशा आर्टिफिशयल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे, जे आराेपी खाेटे बाेलत असेल तर लगेच त्याला पकडेल. या एआयच्या चाचणीसाठी फेससाॅफ्ट ब्रिटन आणि भारतीय पाेलिसांशी चर्चा करत आहे. स्टार्टअपचे संस्थापक- प्लॅस्टिक सर्जन एलन पाेनिया यांच्या मते हे तंत्रज्ञान चेहऱ्यावरील भावना 'मायक्राे -एक्सप्रेशन'च्या रूपाने सादर करताे. जर काेणी उगाचच हसत असेल किंवा हसण्याचा ताळमेळ डाेळ्यांबराेबर हाेत नसेल तर हे मायक्राे- एक्सप्रेशन सतर्क हाेते. त्याचे विश्लेषण करून पाेलिस खाेटे पकडू शकतात. फेससाॅफ्टने अल्गाेरिदमला ३० काेटी हाय रिझाेल्युशनच्या मानवी चेहऱ्यांच्या चित्रांच्या डेटाबेसद्वारे प्रशिक्षित केले आहे.लँकेस्टर विद्यापीठाचे इनाेव्हेशन : भावनांची नाेंद घेणारे रिस्ट बँड येणार, रंग बदलून नियंत्रणासाठी सतर्क करतीललवकरच बाजारात असे रिस्ट बँड येत आहेत जे युजर्सची भावना समजू शकतील. भावना उच्चकाेटीला गेल्यावर हे स्मार्ट हातावरचे बँड गरम हाेऊन रंग बदलतील आणि लहरींद्वारे सतर्क करतील. याद्वारे युजर्सच्या भावना आेळखून त्यावर नियंत्रण मिळवता येईल. ब्रिटनच्या लँकेस्टर विद्यापीठाने हा दावा केला आहे. सॅन डिएगाेमधील डिझाईन इंटरॅक्टीव्ह सिस्टीम परिषदेत याची माहिती देण्यातआली. विद्यापीठाच्या संशाेधकांनी मनगटावर बांधण्यात येणारे रिस्ट बँड आणि स्मार्ट (थर्माेक्राेमिक) साहित्याचा वापर करून या तंत्रज्ञानावर काम केले आहे. चाचणीच्या दरम्यान नमुनात्मक बँडद्वारे निराशा, चिंता आणि बाय- पाेलर समस्याग्रस्तांच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. युजर्सला यासाठी माेबाइलची गरज नाही. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today AI lie detector tell police when suspects arent telling the truth


 आराेपी खाेटे बाेलत आहे असे सांगणारे एआय तंत्रज्ञान स्टार्टअपने केले तयार; ब्रिटन, भारतात चाचणी हाेणार

लंडन - आराेपी खरे बाेलत आहे की खाेटे याचा पत्ता लावणे पाेलिसांसाठी सर्वात कठीण असते. परंतु याला साेपे करण्यासाठी ब्रिटनच्या एका स्टार्टअप फेससाॅफ्टने एक अशा आर्टिफिशयल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे, जे आराेपी खाेटे बाेलत असेल तर लगेच त्याला पकडेल. या एआयच्या चाचणीसाठी फेससाॅफ्ट ब्रिटन आणि भारतीय पाेलिसांशी चर्चा करत आहे. स्टार्टअपचे संस्थापक- प्लॅस्टिक सर्जन एलन पाेनिया यांच्या मते हे तंत्रज्ञान चेहऱ्यावरील भावना 'मायक्राे -एक्सप्रेशन'च्या रूपाने सादर करताे. जर काेणी उगाचच हसत असेल किंवा हसण्याचा ताळमेळ डाेळ्यांबराेबर हाेत नसेल तर हे मायक्राे- एक्सप्रेशन सतर्क हाेते. त्याचे विश्लेषण करून पाेलिस खाेटे पकडू शकतात. फेससाॅफ्टने अल्गाेरिदमला ३० काेटी हाय रिझाेल्युशनच्या मानवी चेहऱ्यांच्या चित्रांच्या डेटाबेसद्वारे प्रशिक्षित केले आहे.

लँकेस्टर विद्यापीठाचे इनाेव्हेशन : भावनांची नाेंद घेणारे रिस्ट बँड येणार, रंग बदलून नियंत्रणासाठी सतर्क करतील
लवकरच बाजारात असे रिस्ट बँड येत आहेत जे युजर्सची भावना समजू शकतील. भावना उच्चकाेटीला गेल्यावर हे स्मार्ट हातावरचे बँड गरम हाेऊन रंग बदलतील आणि लहरींद्वारे सतर्क करतील. याद्वारे युजर्सच्या भावना आेळखून त्यावर नियंत्रण मिळवता येईल. ब्रिटनच्या लँकेस्टर विद्यापीठाने हा दावा केला आहे. सॅन डिएगाेमधील डिझाईन इंटरॅक्टीव्ह सिस्टीम परिषदेत याची माहिती देण्यातआली. विद्यापीठाच्या संशाेधकांनी मनगटावर बांधण्यात येणारे रिस्ट बँड आणि स्मार्ट (थर्माेक्राेमिक) साहित्याचा वापर करून या तंत्रज्ञानावर काम केले आहे. चाचणीच्या दरम्यान नमुनात्मक बँडद्वारे निराशा, चिंता आणि बाय- पाेलर समस्याग्रस्तांच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. युजर्सला यासाठी माेबाइलची गरज नाही.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
AI lie detector tell police when suspects arent telling the truth