अमेरिका-उत्तर कोरियाची हनाेईत खंडित झालेली चर्चा सुरू हाेणार

पनमुंजोम-उत्तर व दक्षिण कोरियातील १९५०-५३ मधील युद्धानंतर बनलेली क्राँकिटची बिगरसैनिक क्षेत्राची (डीएमझेड) सीमा रविवारी एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाली. पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व उत्तर कोरियाचे हुकूमशहा यांनी सीमेत प्रवेश केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर हा विक्रम नोंदवल्या गेला. उत्तर कोरियाचे किम जाँग उन यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. ही भेट म्हणजे त्यांचे व ट्रम्प यांचे संबंध अगदी शानदार आहेत, याचे प्रतिक असल्याचे किम उन यांनी म्हटले.रविवारच्या बैठकीमुळे उत्तर काेरियाकडून पुन्हा चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली गेली हाेती. तत्पूर्वी शनिवारी ट्रम्प यांनी ट्विट करून उन यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली हाेती. त्याला उन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काेरिया क्षेत्राचे नि:शस्त्रीकरण करण्यासाठी ट्रम्प व उन यांच्यात गेल्या वर्षी जूनमध्ये सिंगापूरला पहिली बैठक झाली हाेती. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारीत व्हिएतनामची राजधानी हनाेईत दुसरी बैठक झाली हाेती. त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते. म्हणूनच दाेन्ही नेत्यांमधील ही एकाच वर्षातील दुसरी बैठक हाेती.किम उन पूर्वीच्या तुलनेत जास्त सहज, शब्द पाळण्याची शक्यतातज्ञांच्या मते, बैठकीपूर्वी कूटनीतीच्या पातळीवर तयारीला वेळ मिळाला नव्हता. या नाट्यमय बैठकीकडे अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाच्या दिशेने असलेल्या कटिबद्धतेच्या रूपाने पाहिले जाईल. या वेळी किम जास्त सहज वाटले. त्यावरून ते आता तरी दिलेला शब्द पाळतील. गेल्या वर्षी ट्रम्प व किम यांच्यात िंसंगापूरमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर नि:शस्त्रीकरणाची चर्चा सर्वोच्च पातळीवर गेली होती. याच वर्षी हनोईत उभय नेते भेटले होते. तेव्हा ठोस आराखडा मांडला जाईल, असे वाटले होते. मात्र चर्चा निष्फळ ठरली. चर्चाही थांबली होती.छोटेखानी बैठक लांबली, मून जे इन सहभागी नव्हतेवेळापत्रकानुसार ट्रम्प यांना उन यांची भेट घेतल्यानंतर लष्करी तळावर जाणे अपेक्षित होते. परंतु ते पनमुंजोमला गेले. तेथे उन व ट्रम्प यांच्यात ५० मिनिटे चर्चा झाली. हस्तांदोलनाची ही भेट बरीच लांबली. ट्रम्प यांच्यासमवेत त्यांची मुलगी इव्हांका, जावई जेरेड कुश्नरही होते. ट्रम्प-उन यांच्या बैठकीदरम्यान दोघेही हजर होते. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे इन त्या कक्षात नव्हते.परस्परांना वेडे व सनकीही संबोधले होतेट्रम्प २०१७ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिका व उत्तर कोरियामधील तणाव प्रचंड वाढला होता. आंतरखंडीय क्षेपणास्त्र व हायड्रोजन बाॅम्बची चाचणी केल्यामुळे ट्रम्प यांनी उन यांना परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. तेव्हा किम उन यांनीही पलटवार केला होता. ट्रम्प सनकी व वेडे असल्याचे उन म्हणाले होते, तर उन हे हुकूमशहा व युद्धखोर असल्याचे ट्रम्प म्हणाले होते.इव्हांका, पॉम्पियो यांना ‘सुंदर जोडी’ संबोधलेट्रम्प यांनी डीएमझेडवर सैनिकांशी संवाद साधला. भाषणात त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिआे यांच्या कामाचे कौतुक केले व त्यांना व्यासपीठावर बोलावले. त्यानंतर इव्हांका ट्रम्पही मंचावर आल्या. ट्रम्प म्हणाले, सुंदर जोडी. ‘ब्यूटी अँड द बीस्ट’. इव्हांका व्हाइट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागारही आहेत. ट्रम्प यांच्या स्तुतीवर टाळ्यांचा कडकडाट झाला. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today The US-North Korea talk start which was break up in Hanayat


 अमेरिका-उत्तर कोरियाची हनाेईत खंडित झालेली चर्चा सुरू हाेणार

पनमुंजोम-उत्तर व दक्षिण कोरियातील १९५०-५३ मधील युद्धानंतर बनलेली क्राँकिटची बिगरसैनिक क्षेत्राची (डीएमझेड) सीमा रविवारी एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाली. पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व उत्तर कोरियाचे हुकूमशहा यांनी सीमेत प्रवेश केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर हा विक्रम नोंदवल्या गेला. उत्तर कोरियाचे किम जाँग उन यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. ही भेट म्हणजे त्यांचे व ट्रम्प यांचे संबंध अगदी शानदार आहेत, याचे प्रतिक असल्याचे किम उन यांनी म्हटले.


रविवारच्या बैठकीमुळे उत्तर काेरियाकडून पुन्हा चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली गेली हाेती. तत्पूर्वी शनिवारी ट्रम्प यांनी ट्विट करून उन यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली हाेती. त्याला उन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काेरिया क्षेत्राचे नि:शस्त्रीकरण करण्यासाठी ट्रम्प व उन यांच्यात गेल्या वर्षी जूनमध्ये सिंगापूरला पहिली बैठक झाली हाेती. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारीत व्हिएतनामची राजधानी हनाेईत दुसरी बैठक झाली हाेती. त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते. म्हणूनच दाेन्ही नेत्यांमधील ही एकाच वर्षातील दुसरी बैठक हाेती.

किम उन पूर्वीच्या तुलनेत जास्त सहज, शब्द पाळण्याची शक्यता
तज्ञांच्या मते, बैठकीपूर्वी कूटनीतीच्या पातळीवर तयारीला वेळ मिळाला नव्हता. या नाट्यमय बैठकीकडे अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाच्या दिशेने असलेल्या कटिबद्धतेच्या रूपाने पाहिले जाईल. या वेळी किम जास्त सहज वाटले. त्यावरून ते आता तरी दिलेला शब्द पाळतील. गेल्या वर्षी ट्रम्प व किम यांच्यात िंसंगापूरमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर नि:शस्त्रीकरणाची चर्चा सर्वोच्च पातळीवर गेली होती. याच वर्षी हनोईत उभय नेते भेटले होते. तेव्हा ठोस आराखडा मांडला जाईल, असे वाटले होते. मात्र चर्चा निष्फळ ठरली. चर्चाही थांबली होती.

छोटेखानी बैठक लांबली, मून जे इन सहभागी नव्हते
वेळापत्रकानुसार ट्रम्प यांना उन यांची भेट घेतल्यानंतर लष्करी तळावर जाणे अपेक्षित होते. परंतु ते पनमुंजोमला गेले. तेथे उन व ट्रम्प यांच्यात ५० मिनिटे चर्चा झाली. हस्तांदोलनाची ही भेट बरीच लांबली. ट्रम्प यांच्यासमवेत त्यांची मुलगी इव्हांका, जावई जेरेड कुश्नरही होते. ट्रम्प-उन यांच्या बैठकीदरम्यान दोघेही हजर होते. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे इन त्या कक्षात नव्हते.

परस्परांना वेडे व सनकीही संबोधले होते
ट्रम्प २०१७ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिका व उत्तर कोरियामधील तणाव प्रचंड वाढला होता. आंतरखंडीय क्षेपणास्त्र व हायड्रोजन बाॅम्बची चाचणी केल्यामुळे ट्रम्प यांनी उन यांना परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. तेव्हा किम उन यांनीही पलटवार केला होता. ट्रम्प सनकी व वेडे असल्याचे उन म्हणाले होते, तर उन हे हुकूमशहा व युद्धखोर असल्याचे ट्रम्प म्हणाले होते.

इव्हांका, पॉम्पियो यांना ‘सुंदर जोडी’ संबोधले
ट्रम्प यांनी डीएमझेडवर सैनिकांशी संवाद साधला. भाषणात त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिआे यांच्या कामाचे कौतुक केले व त्यांना व्यासपीठावर बोलावले. त्यानंतर इव्हांका ट्रम्पही मंचावर आल्या. ट्रम्प म्हणाले, सुंदर जोडी. ‘ब्यूटी अँड द बीस्ट’. इव्हांका व्हाइट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागारही आहेत. ट्रम्प यांच्या स्तुतीवर टाळ्यांचा कडकडाट झाला.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
The US-North Korea talk start which was break up in Hanayat