काश्मीरवर यूएनमध्ये 48 वर्षांनी चर्चा, 1971 सारखीच पाकची पुन्हा फजिती

संयुक्त राष्ट्र - कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर शुक्रवारी सायंकाळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरवर बंदद्वार चर्चा झाली. यात पाकला चीन वगळता कुणचाही पाठिंबा मिळाला नाही. भारताचे यूएनमधील स्थायी सदस्य सय्यद अकबरुद्दीन म्हणाले, “जिहादच्या नावाखाली भारतात हिंसाचार भडकावला जात आहे. पाकने दहशतवाद थांबवावा, त्यानंतर चर्चा करू.’ कलम ३७० हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.ही बैठक अनौपचारिक असल्याने त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार नाही. चीनच्या आग्रहावरून झालेल्या या बैठकीला अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि ब्रिटनव्यतिरिक्त १० अस्थायी सदस्य देश उपस्थित होते. संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचे पाकचे षड‌्यंत्र १९७१ मध्येही अपयशी ठरले होते. या वेळी पाकला बैठकीत हजर राहण्यास परवानगी नव्हती. नंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खाननी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली .१९७१ : राष्ट्रसंघात फजिती झाल्यावर झुल्फिकार अली भुत्तो प्रस्ताव फाडत बैठकीतून बाहेर पडलेवरील छायाचित्र १५ डिसेंबर १९७१चे आहे. राष्ट्रसंघात पाकचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुत्तो पाकचे विभाजन करण्याच्या (बांगलादेश) भारताच्या प्रयत्नांना विरोध करत होते. काश्मीर मुद्दाही ते मांडू पाहत होते. मात्र, बहुतांश देश भारताच्या बाजूने होते. यामुळे संतापलेल्या भुत्तो यांनी प्रस्तावाची पाने फाडून बैठकीतून काढता पाय घेतला आणि पाक तोंडावर पडला.काश्मिरात कार्यालये उघडली, शाळा सोमवारपासून सुरू होणार; मात्र मोबाइल, इंटरनेट तूर्त बंदच राहणारश्रीनगर - ईद आणि स्वातंत्र्य दिन शांततेत पार पडल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकार आता खोऱ्यात लागू निर्बंध शिथिल करण्याच्या तयारीत आहे. राज्याचे मुख्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, २२ पैकी १२ जिल्ह्यांतील स्थिती सुरळीत आहे. शुक्रवारी रात्री लँडलाइन फोन सुरू होतील. सोमवारी शाळा उघडतील. शुक्रवारी सर्व सरकारी कार्यालये सुरू होती.- मोबाइल, इंटरनेट बंद राहील. कारण, सेवा सुरू होताच आयएसआय ही पाक गुप्तचर संस्था स्थिती बिघडवण्याच्या तयारीत आहे. - राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले- मागील २० वर्षांत प्रथमच काश्मिरात स्वातंत्र्यदिनी पाकचा ध्वज फडकवल्याची घटना घडलेली नाही.प्रथम आण्विक शस्त्र वापरण्याचे धोरण भविष्यातील परिस्थितीवर अवलंबून : संरक्षणमंत्रीपोखरण । संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आण्विक शस्त्रांचा वापर प्रथम करण्याचे धोरण कायम आहे. मात्र भविष्यातील धोरण परिस्थितीवर अवलंबून राहील. म्हणजेच धोरणात बदल शक्य आहे.- पाकने भारतीय चित्रपटांच्या सीडी विकणाऱ्यांवरही छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. भारतीय कलाकारांच्या जाहिरातींवरही बंदी घातली आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today After 48 years in the UN over Kashmir, Pakistan re-emerged as 1971


 काश्मीरवर यूएनमध्ये 48 वर्षांनी चर्चा, 1971 सारखीच पाकची पुन्हा फजिती

संयुक्त राष्ट्र - कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर शुक्रवारी सायंकाळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरवर बंदद्वार चर्चा झाली. यात पाकला चीन वगळता कुणचाही पाठिंबा मिळाला नाही. भारताचे यूएनमधील स्थायी सदस्य सय्यद अकबरुद्दीन म्हणाले, “जिहादच्या नावाखाली भारतात हिंसाचार भडकावला जात आहे. पाकने दहशतवाद थांबवावा, त्यानंतर चर्चा करू.’ कलम ३७० हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.


ही बैठक अनौपचारिक असल्याने त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार नाही. चीनच्या आग्रहावरून झालेल्या या बैठकीला अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि ब्रिटनव्यतिरिक्त १० अस्थायी सदस्य देश उपस्थित होते. संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचे पाकचे षड‌्यंत्र १९७१ मध्येही अपयशी ठरले होते. या वेळी पाकला बैठकीत हजर राहण्यास परवानगी नव्हती. नंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खाननी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली .


१९७१ : राष्ट्रसंघात फजिती झाल्यावर झुल्फिकार अली भुत्तो प्रस्ताव फाडत बैठकीतून बाहेर पडले
वरील छायाचित्र १५ डिसेंबर १९७१चे आहे. राष्ट्रसंघात पाकचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुत्तो पाकचे विभाजन करण्याच्या (बांगलादेश) भारताच्या प्रयत्नांना विरोध करत होते. काश्मीर मुद्दाही ते मांडू पाहत होते. मात्र, बहुतांश देश भारताच्या बाजूने होते. यामुळे संतापलेल्या भुत्तो यांनी प्रस्तावाची पाने फाडून बैठकीतून काढता पाय घेतला आणि पाक तोंडावर पडला.


काश्मिरात कार्यालये उघडली, शाळा सोमवारपासून सुरू होणार; मात्र मोबाइल, इंटरनेट तूर्त बंदच राहणार
श्रीनगर - ईद आणि स्वातंत्र्य दिन शांततेत पार पडल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकार आता खोऱ्यात लागू निर्बंध शिथिल करण्याच्या तयारीत आहे. राज्याचे मुख्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, २२ पैकी १२ जिल्ह्यांतील स्थिती सुरळीत आहे. शुक्रवारी रात्री लँडलाइन फोन सुरू होतील. सोमवारी शाळा उघडतील. शुक्रवारी सर्व सरकारी कार्यालये सुरू होती.


- मोबाइल, इंटरनेट बंद राहील. कारण, सेवा सुरू होताच आयएसआय ही पाक गुप्तचर संस्था स्थिती बिघडवण्याच्या तयारीत आहे.
- राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले- मागील २० वर्षांत प्रथमच काश्मिरात स्वातंत्र्यदिनी पाकचा ध्वज फडकवल्याची घटना घडलेली नाही.


प्रथम आण्विक शस्त्र वापरण्याचे धोरण भविष्यातील परिस्थितीवर अवलंबून : संरक्षणमंत्री
पोखरण । संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आण्विक शस्त्रांचा वापर प्रथम करण्याचे धोरण कायम आहे. मात्र भविष्यातील धोरण परिस्थितीवर अवलंबून राहील. म्हणजेच धोरणात बदल शक्य आहे.


- पाकने भारतीय चित्रपटांच्या सीडी विकणाऱ्यांवरही छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. भारतीय कलाकारांच्या जाहिरातींवरही बंदी घातली आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
After 48 years in the UN over Kashmir, Pakistan re-emerged as 1971