DvM Special : २१ व्या वर्षी अत्याचाराची बळी ठरली लुईस, चित्र काढून दोषीला अडकवले

न्यूयॉर्क -लॉस एंजलिसच्या ६९ वर्षीय स्केच आर्टिस्ट लुईस गिब्सन यांनी काढलेल्या रेखाचित्राच्या साहाय्याने आतापर्यंत १२०० गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या अाहेत. वयाच्या २१ व्या वर्षी अत्याचारास बळी पडलेल्या लुईस यांचे नाव २०१७ मध्ये गिनीज बुकमध्ये नोंदले आहे. त्यांच्या स्केचच्या साहाय्याने तोपर्यंत ७५१ आरोपी पकडले होते. घरात घुसलेल्या आरोपीने लुईस यांच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपीला पकडण्यासाठी लुईस अभिनय क्षेत्र सोडून रेखाचित्राची कला शिकण्यासाठी टेक्सासला गेली. एक दिवस १२ वर्षीय विद्यार्थ्यांसमोर डान्स इन्स्ट्रक्टरवर अत्याचार झाल्याचे तिला समजले. चित्रकला चांगली होती, त्यामुळे तिने पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीचे वर्णन ऐकले आणि रेखाचित्र तयार केले. याच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीस पकडले. पोलिसांना विविध गुन्ह्यांमध्ये मदत केली पाहिजे, असे लुईस यांचे मत आहेलुईस यांच्या नावाची गिनीज बुकमध्ये नोंद> लुईस गिब्सननी चित्रकलेचा शस्त्र म्हणून वापर करत अनेक प्रकरणांत पोलिसांना मदत केली.> रेखाचित्र इतके अचूक असते की आरोपी पकडलाच जातो. अनेक आरोपी सुटकेचा मार्ग नसल्याने रेखाचित्र पाहिल्यावर स्वत:हून शरण येतात. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today DvM Special: Lewis, the victim of torture at the age of 21, draw picture and help police to catch criminal


 DvM Special : २१ व्या वर्षी अत्याचाराची बळी ठरली लुईस, चित्र काढून दोषीला अडकवले

न्यूयॉर्क -लॉस एंजलिसच्या ६९ वर्षीय स्केच आर्टिस्ट लुईस गिब्सन यांनी काढलेल्या रेखाचित्राच्या साहाय्याने आतापर्यंत १२०० गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या अाहेत. वयाच्या २१ व्या वर्षी अत्याचारास बळी पडलेल्या लुईस यांचे नाव २०१७ मध्ये गिनीज बुकमध्ये नोंदले आहे. त्यांच्या स्केचच्या साहाय्याने तोपर्यंत ७५१ आरोपी पकडले होते. घरात घुसलेल्या आरोपीने लुईस यांच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपीला पकडण्यासाठी लुईस अभिनय क्षेत्र सोडून रेखाचित्राची कला शिकण्यासाठी टेक्सासला गेली. एक दिवस १२ वर्षीय विद्यार्थ्यांसमोर डान्स इन्स्ट्रक्टरवर अत्याचार झाल्याचे तिला समजले. चित्रकला चांगली होती, त्यामुळे तिने पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीचे वर्णन ऐकले आणि रेखाचित्र तयार केले. याच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीस पकडले. पोलिसांना विविध गुन्ह्यांमध्ये मदत केली पाहिजे, असे लुईस यांचे मत आहे

लुईस यांच्या नावाची गिनीज बुकमध्ये नोंद

> लुईस गिब्सननी चित्रकलेचा शस्त्र म्हणून वापर करत अनेक प्रकरणांत पोलिसांना मदत केली.
> रेखाचित्र इतके अचूक असते की आरोपी पकडलाच जातो. अनेक आरोपी सुटकेचा मार्ग नसल्याने रेखाचित्र पाहिल्यावर स्वत:हून शरण येतात.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
DvM Special: Lewis, the victim of torture at the age of 21, draw picture and help police to catch criminal