काका-बाबा मनोमिलन कॉंग्रेसच्या उभारीची नांदी ठरेल - डॉ. सुरेश जाधव

कराड दक्षिण मतदारसंघाची  राज्यात वेगळी ओळख आहे.  विलासकाका व पृथ्वीराजबाबा यांची दोन्ही घराण्यांनी स्वातंत्र्यापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिली आहेत. दोघांनाही काँग्रेसची विचारधारा जोपासली आहे. त्यामुळे या दोन्ही गटात मनोमिलन  व्हावे, ही सर्वांची इच्छा होती. ते घडवून आणण्यात बंटी पाटील यांचा मोठा वाटा आहे. दोन्ही गटाच्या एकात्रीकरणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह असून  यामुळे जिल्हा काँग्रेसला बळकटी  मिळण्यासाठी आहे. तसेच काका-बाबा गटाचे मनोमिलन कॉंग्रेसच्या उभारीची नांदी ठरेल.

काका-बाबा मनोमिलन कॉंग्रेसच्या उभारीची नांदी ठरेल - डॉ. सुरेश जाधव

काका-बाबा मनोमिलन कॉंग्रेसच्या उभारीची नांदी ठरेल - डॉ. सुरेश जाधव 

कराड/प्रतिनिधी : 
        कराड दक्षिण मतदारसंघाची  राज्यात वेगळी ओळख आहे. विलासकाका व पृथ्वीराजबाबा यांची दोन्ही घराण्यांनी स्वातंत्र्यापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिली आहेत. दोघांनाही काँग्रेसची विचारधारा जोपासली आहे. त्यामुळे या दोन्ही गटात मनोमिलन व्हावे, ही सर्वांची इच्छा होती. ते घडवून आणण्यात बंटी पाटील यांचा मोठा वाटा आहे. दोन्ही गटाच्या एकात्रीकरणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह असून यामुळे जिल्हा काँग्रेसला बळकटी  मिळण्यासाठी आहे. तसेच काका-बाबा गटाचे मनोमिलन कॉंग्रेसच्या उभारीची नांदी ठरेल, असे मत जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी व्यक्त केले.
            येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी 3 रोजी कॉंग्रेस पक्षाच्या नियोजित मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
           यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहराध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, कराड दक्षिण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, युवानेते इंद्रजित चव्हाण, नगरसेवक इंद्रजित गुजर, मलकापूर नगरपरिषदेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष मोहन शिंगाडे आदींची उपस्थिती होती. 
           जिल्हाध्यक्ष म्हणाले, एकेकाळी जिल्हा बँकेच्या माध्यमातून विलासकाकांची जिल्ह्यावर पकड होती. आता दोन्ही गटांच्या मनोमिलानाने त्याचा नक्कीच जिल्ह्यात कॉंग्रेसला फायदा होणार आहे. माझ्या जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष काळात हे मनोमिलन होणार असल्याचा आनंदच आहे. आगामी दोन महिन्यातच या मनोमिलनामुळे पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसेल, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.   
           मनोहर शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा हा राज्याला दिशा देणारा जिल्हा आहे. कराड दक्षिण मतदारसंघाने स्वातंत्र्यापासून काँग्रेसची पाठराखण केली आहे. आदरणीय यशवंतराव भाऊ, विलासकाका आणि पृथ्वीराजबाबा यांनी कॉंग्रेसची विचारधारा जोपासली. आता काका-बाबा गटांच्या एकतत्रीकारणामुळे जिल्ह्यात पक्षाला नक्कीच बळकटी मिळेल. 
          मलकापूर निवडणुकीत उदयदादा, काका आणि बाबा यांनी एकत्रित भूमिका घेतली. तेव्हापासून खऱ्याअर्थाने एकत्रीकरणाची सुरुवात झाली. या दोन्ही नेत्यांनी आत्तापर्यत विविध सहकारी संस्थांमध्ये सर्वसामान्य माणसांना स्थान देण्याचे काम केले. आतातर विचारांनीच नव्हे तर मनानेही ते एकत्र आले आहेत. त्यामुळे मनोमिलनाचा हा निर्णय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा असून लोकांच्या दृष्टीनेही तो सकारात्मक आहे. दोन्ही गटांच्या एकात्रीकरणामुळे जिल्ह्यात पक्षाला नक्कीच गतवैभव मिळेल. या मनोमिलनातून कोणाला काय मिळते? यापेक्षाही महत्वाचे यामुळे काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठी ताकद मिळणार असल्याचे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले.
          प्रा. काटकर म्हणाले, काका-बाबा दोन्ही गट एकत्र आले पाहिजेत, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची भूमिका आहे. परंतु, मध्यंतरी काही कालावधीत कोणाचीतरी त्याला दृष्ट लागली. दृष्ट काढण्यासाठी हातगुण असणारा वैद्य लागतो. ही भूमिका बंटी पाटील यांनी समर्थपणे निभावले आहे. 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता येथील पंकज हॉटेलमध्ये काँग्रेसचा मेळावा संपन्न होणार आहे. 
         या मेळाव्याला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषीराज्यमंत्री विश्वजित कदम, माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर, उदयसिंह पाटील-उंडाळकर, कॉंग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

 *पतंगराव कदम यांना मोठा आनंद झाला असता* 

जिल्ह्यात कॉंग्रेसला बळकटी आणण्यासाठी काका-बाबा गटाने एकत्र यावे, अशी माजी मंत्री आदरणीय पतंगराव कदम यांची खूप इच्छा होती. या दोन्ही गटाच्या मनोमिलनाने ती इच्छा पूर्ण झाली असून त्यांचे सुपुत्र मंत्री विश्वजित कदम याचे साक्षीदार असणार आहेत. ही बाब आनंददायी आहे. परंतु, आज पतंगराव कदम साहेब असते; तर त्यांना मोठा आंनद झाला असता, असे भावनिक मत मनोहर शिंदे यांनी व्यक्त केले. 

*इतर पक्षांचे कार्यकर्ते कॉंग्रेसच्या संपर्कात*

कॉंग्रेसचा मेळावा हा काका-बाबा मनोमिलनाची नांदी ठरणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या एकत्रीकरणामुळे जिल्हा कॉंग्रेसला मोठी उभारी मिळणार आहे. या अंदाजानेच काही दिवसांपासून जिल्ह्यातील इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचे सूचक विधान जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव यांनी केले.