जिल्ह्यातील खाकीला कोरोनाचा धक्का

जिल्ह्यातील खाकीला कोरोनाचा धक्का

कराड/प्रतिनिधी

मार्च महिन्यात कोरोनाची इन्ट्री जिल्ह्यात झाली परंतु मे अखेर तळागाळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखणारी खाकी कोरोना पासून दूर होती.परंतु शिरवळ येथील चेकपोस्ट वरील एक उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ पसरली आहे.कोरोना वोरियर्सच कोरोना बाधित झाल्याने जिल्ह्याचा इन्ट्री पॉईंट हिटलिस्टवर आला असून इन्ट्री पॉईंटला तपासणी करणारेच बाधित झाल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.यामुळे जिल्ह्यातील खाकीला कोरोनाचा धक्का बसला आहे.

जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले तसेच शिरवळ चेकपोस्टवरील पोलीस अधिकार्‍याला करोना झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.त्यामुळे पोलिसांनी काळजी घेणे गरजेचे आहे कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवरील ताण वाढत आहे. या काळातही पोलिस अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत.करोना संसर्गाचा मुकाबला करताना पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. 

कोरोना महामारीच्या काळात पोलीस यंत्रणा चोवीस तास कार्यरत असल्याने हृदयविकार,डायबेटिस, सांधेदुखी  यासारखे त्रास पन्नास वर्षावरील तसेच सर्वसामान्य पोलिसांमध्ये आढळत आहेत. त्यांना असे त्रास जाणवू लागल्यानंतर सलग काही तास उभे राहणे टाळले पाहिजे. प्रामुख्याने त्यांचे काम धूळ धूर, प्रदूषण यांना सामोरे जाऊनच करावे लागते, तसेच बाहेरून आलेल्या लोकांची तपासणी करण्यासाठी सतत उभे राहावे लागते.बदलत्या वातावरणाचा त्रास झेलावा लागतो. मात्र, यासाठी त्यांना काम टाळणे किंवा कामात बदलही सहज शक्य होत नाही. त्यासाठी त्यांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

चोवीस तास जनतेच्या संपर्कात असणाऱ्या खात्यात काम करतांना पोलिसांना सर्वच आघाड्यावर लढावे लागते. त्यासाठी पोलिसांनी आपले आरोग्य तंदुरुस्त राहील याकडे लक्ष ठेवावे.शरीर निरोगी राहिले तर समाजाच्या सुरक्षेसाठी तत्पर राहता येईल त्यासाठी तुमच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आहे यामुळे त्यांनाही काळजी लागून राहिलेली असते यामुळे बाहेर पडताना मुलाबाळांची काळजी घेऊन सोशल डिस्टन्स पाळले पाहिजे , यामुळे।घरी असणाऱ्या बायका पोरांसाठी तसेच आई वडील आप्तजन यांच्या साठी तरी पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे.चेक पोस्ट वर पार जिल्ह्यातील नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे पोलीस डॉक्टर नाहीत यामुळे कोण निगेटिव्ह आणि कोण पॉझिटीव्ह हे चेहऱ्यावरून कळणार नाहीत आपल्या सारखी हजारो माणसे चेकपोस्ट वर येतात यामुळे सर्वानीच काळजी घेणे महत्वाचे आहे सगळीच जबाबदारी पोलिसांची नाही काही जबाबदारी ही कर्तव्यनिष्ठ नागरिकांचीही आहे ती एक नागरिक म्हणून पार पाडूया.यासाठी पोलिसांनी कर्तव्यापासून दूर जावा असे म्हणणार नाही पण कर्तव्य करत असताना काळजी सुद्धा घ्या.