उंब्रज मधील कोरोना बाधित निकट सहवासातील दोन जण कोरोना पॉझिटीव्ह

उंब्रज मधील कोरोना बाधित निकट सहवासातील दोन जण कोरोना पॉझिटीव्ह

 

5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 93 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
सातारा दि. 18 (जिमाका) :  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारा ठाणे येथून प्रवास करुन आलेला 26 वर्षीय व 67 वर्षीय पुरुष व मुळची सोलापूर जिल्ह्यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेली एक 32 वर्षीय महिला व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे कोविड बाधित रुग्णाचा निकट सहवासित म्हणून दाखल असणारे 53 व 22 वर्षीय नागरिक असे एकूण 5 नागरिकांचे अहवाल   कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
93 जणांना अहवाल आले निगेटिव्ह 
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 26, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 64 व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 3 असे एकूण 93 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 138 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 70 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 66 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.
★★★★★★★★★★★★★★★★★★★

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज येथील चोरे रोड परिसरातील कराड कॉटेज येथील कर्मचारी युवतीच्या निकट सहवासातील दोन जण कोरोना बाधित असल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोना पॉझिटीव्ह असणारे दोन्ही व्यक्ती सध्या कराड येथे इन्स्टिट्यूट क्वारनटाईन असल्याने फारशी चिंतेची बाब नसल्याचे मत डॉ संजय कुंभार यांनी व्यक्त केले असून आता या दोन नवीन बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी करणार असल्याचे सांगितले

★★★★★★★★★★★★★★★★★★★★