उंब्रज पोलिसांनी तिसरा डोळा उघडला,ड्रोन कॅमेऱ्याने राहणार घारी सारखी नजर

जिल्ह्यात कोरोनो रुग्णांची संख्या वाढत आहे.यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यासाठी संचारबंदी व जमावबंदी लागू केलेली आहे.या आदेशाचे जे उल्लंघन करत आहेत.त्याच्या वर पोलीस कारवाई करत आहेत.या कारवाईला मर्यादा येत असल्यामुळे अशा नागरिकांना शोधण्यासाठी आज पासून उंब्रज पोलिसांनी अत्याधुनिक ड्रोनच्या यंत्रणेचा वापर सुरू केला आहे.

उंब्रज/प्रतिनिधी

उब्रंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये विनाकारण फिरत असणाऱ्या,गल्ली बोळात फिरणाऱ्या व गल्लीत एकत्र बसणाऱ्या नागरिकांच्यावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. या ड्रोनच्या कॅमेरा मध्ये कैद होणाऱ्या नागरिकांच्यावर संचारबंदी व जमावबंदी चे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. संबधित व्यक्तीच्या वर संचारबंदी व जमावबंदीचा गुन्हा दाखल झाला तर त्यांचे क्राईम रेकाॅर्ड तयार होते.त्यामुळे भविष्यात सरकारी अथवा खाजगी नोकरी,पासपोर्ट व इतर कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी चारित्र्य पडताळणी होते.तेव्हा त्यात गुन्हा नोंद असल्याची माहिती दिली जाते.त्यामुळे आता ज्याच्या वर गुन्हे दाखल होतील त्याना भविष्यात अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. पालकांनी आपली मुले बाहेर फिरणार नाहीत यांची दक्षता घेणे गरजेचे आहे.अन्यथा संबधित मुलांच्या वर गुन्हे दाखल झाले तर त्यांचे भविष्यातील करिअर अडचणीत येऊ शकते.