केन अग्रोवर रयत क्रांतिचा ठीय्या ऊस बिल मिळाल्याशिवाय माघार नाही- सचिन नलवड़े

केन अग्रोवर रयत क्रांतिचा ठीय्या                                                                                                                                              ऊस बिल मिळाल्याशिवाय माघार नाही- सचिन नलवड़े


ऊस बिल मिळाल्याशिवाय माघार नाही- सचिन नलवड़े

  कडेगाव

कडेगाव तालुक्यातील रायगाव येथील केनअग्रो या साखर कारखान्याने मागील वर्षीच्या गळीत हंगामातील ऊस बिल गेले आठ महीने झाले तरी अद्याप शेतकऱ्यांना दिले नाही। सचिन नलवड़े यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा कारखान्यावर धड़क मारून आंदोलन केली यावेळी पोलीस प्रशासनाने मध्यस्थितिची भूमिका घेवून कारखान्याने एकोनीस ऑगस्ट पर्यंत ऊस बिल न दिल्यास कारखान्याचे प्रशासन व संचालक वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन  दिल्याने शेतकऱ्यांना थकित ऊस बिल मिळण्याची आशा होती, परंतु पोलीस प्रशासनाला ही कारखाना प्रशासनाने ठेंगा दखावला आहे. 
केन अग्रो ने प्रत्येक वेळी वायदे करुण शेतकऱ्यांना फसवल्याने संतप्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थकित ऊसबिला साठी रयत क्रांतिचे सचिन नलवड़े यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर ठिय्या मारला आहे, सचिन नलवड़े यांनी केलेल्या आवाहनाप्रमाने शेतकरी खरडा भाकरी व अन्थरुन पांगरुन घेवून आले होते, सकाळी बारा वाजता शेतकरी कारखाना कार्यस्थाळवर जमा झाले होते सायंकाळी सहा वाजले तरी शेतकरी कारखान्याच्या कार्यालयसमोर बसून आहेत, जो पर्यंत ऊस बिल मिळत नाही तोपर्यंत कारखान्यावरुन घरी न जाण्याचा ईरादा केला आहे, तसेच पोलीस प्रशासनाने दिलेला शब्द पाळून कारखाना प्रशासनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.