शासनाला हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा खंडित करण्याचा अधिकार नाही - संभाजीराव भिडे

शासनाने पंढरपूर पायी वारी करणाऱ्या ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केले आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून शासनाला हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा खंडित करण्याचा कोणताही अधिकार नाही.

शासनाला हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा खंडित करण्याचा अधिकार नाही - संभाजीराव भिडे
कराड : शासनाच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढताना श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) व धारकरी

शासनाला हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा खंडित करण्याचा अधिकार नाही

संभाजीराव भिडे : कराडात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हिंदू संस्कृती, परंपरेत ढवळाढवळ करणाऱ्या शासनाचा जाहीर निषेध 

कराड/प्रतिनिधी :

        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पंढरपूर पायी वारीला विरोध केला आहे. परंतु, जाहीर सभा, निवडणुका, राजकीय लोकांचे लग्न सोहळे व वाढदिवस आदींना शासन परवानगी देते. मात्र, वारकऱ्यांची पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये, म्हणून ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी  ठराविक वारकऱ्यांना घेऊन पायी वारी करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून शासनाला हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा खंडित करण्याचा कोणताही  अधिकार नसल्याचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी ठणकावले आहे. 

       शासनाने पायी वारीला विरोध करून हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा व संस्कृती खंडित केल्याने तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ कराडात श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदूस्थानच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा जाहीर निषेध नोंदवण्यात  आला. 

       श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या प्रमुख उपस्थित आज सोमवारी ५ रोजी येथील दत्त चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीपासून ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच श्री शिवप्रतिष्ठानतर्फे तहसिलदार अमरदीप वाकडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. 

      यावेळी इतिहास अभ्यासक प्रा. के. एन. देसाई, श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदूस्थानचे जिल्हा कार्यवाह केदार डोईफोडे, कराड तालुका कार्यवाह सागर आमले, डॉ. प्रवीण माने यांच्यासह अनेक धारकरी उपस्थित होते. दरम्यान, तहसिलदारांना निवेदन दिल्यानंतर संभाजीराव भिडे (गुरुजी) पोलिसांनी ह.भ.प. बंडातात्या करड्करांना स्थानबद्ध केलेल्या करवडी ता. कराड येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्राकडे धारकऱ्यांसोबत रवाना झाले आहेत.