इतना सन्नाटा क्यू है भाई.....

उत्तरेतील 'सुभेदारी' साठी उंब्रज ग्रामपंचायतीचा रणसंग्राम

इतना सन्नाटा क्यू है भाई.....

इतना सन्नाटा क्यू है भाई.....

उत्तरेतील 'सुभेदारी' साठी उंब्रज ग्रामपंचायतीचा रणसंग्राम

कराड तालुक्याच्या राजकीय वतनदारीतील सर्वात मोठी सुभेदारी असणारे गाव म्हणजे उंब्रज येथील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीला एक महिन्याच्या अवधी शिल्लक राहिला असताना सहा वॉर्ड मधील राजकीय शांतता नागरिकांच्यात चर्चेचा विषय ठरला असून 'इतना सन्नाटा क्यू है भाई' अशी खसखस पिकली आहे.

भराव पुलामुळे दोन भागात विभागली गेलेली उंब्रज नगरी सहा वॉर्डच्या रचनेमुळे ऐसपैस पसरले आहे  १,२ व ३ नंबर वॉर्ड हायवेच्या पश्चिमेला आहेत तर ४,५ व ६ नंबर वॉर्ड हे हायवेच्या पूर्वेला आहेत यामुळे ८ ग्रामपंचायत सदस्य हे पूर्वेकडून तर ९ पश्चिमेकडून निवडून जाणार आहेत.यामुळे मोठी चुरस निर्माण झाली असून राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष गावपातळीवर कशी निवडणूक लढणार याबाबत अनेक शंका कुशंका चर्चिल्या जात आहेत.तर भाजपने जाहीर केल्याप्रमाणे या निवडणुकीत पॅनल असणार का ? याबाबत संभ्रमावस्था आहे.याबरोबरच तरुणांचा एक गट हा पूर्ण ताकदीने पॅनल उभा करण्याची तयारी करत असल्याची कुणकुण असून निवडणूक रंगतदार होणार असल्याबाबत ग्रामस्थ सांगत आहेत.

सरपंच पदाचे आरक्षण पुढे ढकलले असून याबाबतचा निर्णय हा १५ जानेवारीला होणार असल्याची चर्चा असल्याने पॅनेलच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा या चिंतेत पॅनेल प्रमुख तसेच गावचे कारभारी आहेत.सरपंच निवड सदस्यांनी करायची असल्याने थेट सरपंच या संकल्पनेला बगल मिळाली आहे.यामुळे मतमोजणी नंतर घोडेबाजार होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.सगळंच गणित सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर ठरणार असल्याची चर्चा सहाच्या सहा वार्ड मध्ये सुरू असून होणारी लढत दुरंगी तिरंगी का बहुरंगी होणार हे येणार काळच ठरविणार आहे.यामुळे कौन 'कितने पाणीमे हे येणारा काळच ठरविणार आहे.

वॉर्ड निहाय आरक्षण 

वॉर्ड क्र.१

मध्ये ओबीसी १ सर्वसाधारण महिला १ व खुला वर्ग १ असे मिळून ३ सदस्य

 

वॉर्ड क्र.२

मध्ये एस सी १ ओबीसी १ सर्वसाधारण महिला १ असे ३ सदस्य असणार आहेत तर

 

वॉर्ड क्र.३

मध्ये सर्वसाधारण महिला १ व खुला वर्ग १ असे २ सदस्य असणार आहेत

 

वॉर्ड क्र.४

मध्ये ओबीसी १ सर्वसाधारण महिला १ खुला १ असे ३ सदस्य असणार आहेत

 

वॉर्ड क्र ५

मध्ये ओबीसी महिला १,सर्वसाधारण महिला १,खुला १ असे सदस्य असणार आहेत तर

 

वॉर्ड क्र.६

मध्ये एस सी महिला १ ओबीसी महिला १ व खुला १ असे 3 सदस्य असणार आहेत.

 

ग्रामपंचायतीत महिला राज

५३% महिला ४७% पुरुष सदस्य असणाऱ्या उंब्रज ग्रामपंचायतीचे सहा वॉर्डचे एकूण मतदान सुमारे ११ हजारांच्या आसपास असून १७ सदस्य असणाऱ्या उंब्रज ग्रामपंचायतीच्या बॉडी मध्ये एस सी १ ओबीसी २ एस सी महिला १ ओबीसी महिला ३ सर्वसाधारण महिला ५ व खुला ५ अशी संख्या असणार असून यामध्ये ९ महिला आणि ८ पुरुष सदस्य असणार आहेत.