वाई तालुक्यात मोफत रेशन वाटप १ मे पासून सुरु

वाई तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांन मधुन १ मे पासून मोफत माणसी पाच किलो धान्य वाटप सुरु झाले आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार रणजित भोसले यांनी केले आहे

वाई तालुक्यात मोफत रेशन वाटप १ मे पासून सुरु
वाई तालुक्यात मोफत रेशन वाटप १ मे पासून सुरु

वाई तालुक्यात मोफत रेशन वाटप १ मे पासून सुरु 

वाई / दौलतराव पिसाळ 

वाई तालुक्यातील तहसील कार्यालयातील रेशनींग विभागा मार्फत गावो गावच्या १०८ स्वस्त धान्य दुकाना मार्फत राज्य सरकारच्या 
अन्य नागरी पुरवठा विभागाच्या आदेशा नुसार व सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेने मे महिन्या साठी वाई तालुक्यातील अन्य सुरक्षा योजनेसह अंतोदय योजनेतील प्रत्येक  शिधा पत्रिका धारकांना माणसी पाच किलो या प्रमाणे  धान्य फुकट वाटण्याचे दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी दि. १ मे पासून सुरु झाली आहे शासनाच्या या निर्णया मुळे वाई तालुक्यातील अंदाजे २५ हजार ७४२ कार्ड धारकांना याचा लाभ घेता येणार आहे

 

त्याच बरोबर माणसी मोफत  मिळणारे धान्य हे राज्य सरकारने लॉकडॉऊनच्या कालावधीत दोन वेळची भोजन व्यवस्था व्हावी कोणीही शिधा पत्रिका धारकांच्या घरातील उपाशी पोटी राहु नये हा हेतु डोळ्या समोर ठेवून केलेली हि व्यवस्था आहे पण मोफत मिळालेले हे धान्य कोणीही 
बाहेरील खाजगी दुकानात विक्री करताना अथवा जनावरांना भरडुन घालताना आढळून आल्यास अशांची शिधा पत्रिका कायम स्वरूपी  तातडीने रद्द 
करण्यात येणार आहे तसेच रास्त भाव दुकाना मधुन देखील धान्याचे वाटप  सुरळीत पणे विना तक्रार करायचे आहे वरील सर्व बाबींवर  लक्ष ठेवण्या साठी आवश्यक्ते नुसार भरारी पथके देखील तयार करण्यात आली आहेत अशी माहिती वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे 

 

रणजित भोसले पुढे म्हणाले कि गेल्या मार्च महिन्या पासून देशात आणी  राज्यातील जिल्हा व तालुका स्तरावरील शहरांन सह गावा गावांन मध्ये कोरोनो रोगाने थैमान घालुन नागरीक दिवसे दिवस बाधीत निघत आहेत तर अनेकांना त्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत याचे भान ठेवून  जानेवारी महिन्या पासुन महसूल पोलिस आणी आरोग्य प्रशासन सज्ज ठेऊन नागरिकांनी अनावश्यक रस्त्यावर फिरु नये तोंडाला मास्कचा वापर करावा समांतर अंतर ठेवावे आणी मला काय होणार नाही या विश्वासावर नागरीक कायद्यांचे ऊलंघन करुन दुदैवाने फिरताना दिसतात त्यामुळे आणी फाजील विश्वासा मुळे गेल्या चार महिन्या पासून कोरोनोची रुग्ण संख्येत झपाट्याने वाई शहरासह गावोगावी झपाट्याने वाढ होताना दिसत आहे या वर तातडीचा ऊपाय आणी कोरोनोची साखळी तोडण्या साठी राज्य सरकारने लॉक डाऊनचा पर्याय शोधला आहे

 

कोरोनोची आलेली हि दुसरी लाट या मध्ये झटपट कोरोनोची लागण होताना दिसत आहे त्या मध्ये ऊपचारा दरम्यान बहुतांश ५० वर्षाच्या आतील तरुणांची मृत्यूची संख्या दिसुन येत आहे याचे भान तरुण वर्गाने ठेऊन कायद्यांचे उल्लंघन न करता घरातच बसून रहायचं आहे व आपण आणी आपले कुटुंब कसे सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी या काळात नागरीकांच्या हाताला काम नसल्याने राज्य सरकारने लॉक डॉऊनच्या कालावधीत कोणीही ऊपासी राहु नये म्हणून शिधा पत्रीकेवर   मोफत धान्याचा पुरवठा १ मे पासून सुरु केला आहे त्याचा लाभ घेत वाई तालुक्यातील नागरीकांनी घरातच बसून कोरोनोची साखळी तोडण्या साठी सहकार्य करावे असे आवाहन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी बोलताना केले आहे