पाकिस्तानातील सियालकोटच्या 1000 वर्षे जुन्या शिवाला मंदिराला 72 वर्षानंतर उघडले, फाळनीनंतर झाले होते बंद

अमृतसर- पाकिस्तान सरकारने गुरुद्वारा बाबे की बेरनंतर आता सियालकोटमधील 1000 वर्षे जुन्या शिवाला तेजा सिंह मंदिरला उघडले आहे. यासोबत पाकिस्तानने गुरुद्वारा साहिब आणि शिवालाला कायम उघडे ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच हे मंदिर भारतीय वास्तुकलेचा एक उत्कृष्ठ नमुना असल्याने मंदिराच्या जिर्णोधाराचे कामही होईल असे सांगितले.बाबरी मस्जिद पाडल्यानंतर या मंदिराला पाडण्यात आले होते1947 मध्ये देशाची विभागणी झाल्यावर शिवालाला बंद करण्यात आले होते. तेव्हा हिंदूंनी ती जागा सोडल्यामुळे हे मंदिर जिर्ण झाले. 1992 मध्ये अयोध्येत बाबरी मस्जिद विध्वंसानंतर शिवालाला काही कट्टरपंथ्यांनी बॉम्बने उडवले होते. यात मंदिराचे अनेक खांब मोडले, तेव्हापासून तेथे ये जा करणाऱ्यांची संख्या आणखीनच कमी झाली.अनेक दिवसांपासून या शिवालाला उघडण्याची अनेक हिंदू संघटनांची मागणी होती. यात जिल्हा कौंसिलचे माजी रतन लाल, एमएनए रमेश कुमार कुमार बंकवानी हे प्रमुख आहेत. डिप्टी सेक्रेटरी हिंदू अफेअर्स, एक्यू ट्रस्ट प्रापर्टी बोर्ड फराज अब्बासने दैनिक भास्करला सांगितले की, हा निर्णय हिंदूंची मागणी आणि शिवालाच्या महत्त्वाकडे पाहून करण्यात आला आहे.पाक सरकार शिवालाच्या संरक्षणासाठी 50 लाख रुपये खर्च करणार. बोर्डाचे चेयरमॅन डॉ.आमीर अहमदने याच्या जिर्णोधाराचे काम लवकर सुरू होईल असे सांगितले. बॉम्ब ब्लास्टमध्ये वाचलेले भाग अजून सुरक्षित आहे. मंदिराचे छत, गुफा आणि इतर लहान-मोठी कामे आहेत. श्री गंगा राम हेरिटेज फाउंडेशनचे डायरेक्टर सैयद शाहीन हसनने सांगितले की, अनेक लोक याच्या जिर्णोधारासाठी मदत करतील.शिवालाचे निर्माण 1000 वर्षांपूर्वी, म्हणजेच 10व्या शतकात झाले होते. या शतकातच खजुराहोसहित दक्षिण भारतातातील अनेक मंदिरांना बनवणे सुरू होते. शिवाला तेजा सिंहवर मंदिरवरही याच वास्तु कलेची छाप आहे. मंदिरावरचे नक्षीकाम अतिशय संदुर आहे. मंदिराच्या जिर्णोधारानंतर धार्मिकच नाही तर पर्यटन स्थळ म्हणूनही हे समोर येईल. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today 1000 years old Shivala temple of Sialkot open after 72 years


 पाकिस्तानातील सियालकोटच्या 1000 वर्षे जुन्या शिवाला मंदिराला 72 वर्षानंतर उघडले, फाळनीनंतर झाले होते बंद

अमृतसर- पाकिस्तान सरकारने गुरुद्वारा बाबे की बेरनंतर आता सियालकोटमधील 1000 वर्षे जुन्या शिवाला तेजा सिंह मंदिरला उघडले आहे. यासोबत पाकिस्तानने गुरुद्वारा साहिब आणि शिवालाला कायम उघडे ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच हे मंदिर भारतीय वास्तुकलेचा एक उत्कृष्ठ नमुना असल्याने मंदिराच्या जिर्णोधाराचे कामही होईल असे सांगितले.


बाबरी मस्जिद पाडल्यानंतर या मंदिराला पाडण्यात आले होते
1947 मध्ये देशाची विभागणी झाल्यावर शिवालाला बंद करण्यात आले होते. तेव्हा हिंदूंनी ती जागा सोडल्यामुळे हे मंदिर जिर्ण झाले. 1992 मध्ये अयोध्येत बाबरी मस्जिद विध्वंसानंतर शिवालाला काही कट्टरपंथ्यांनी बॉम्बने उडवले होते. यात मंदिराचे अनेक खांब मोडले, तेव्हापासून तेथे ये जा करणाऱ्यांची संख्या आणखीनच कमी झाली.

अनेक दिवसांपासून या शिवालाला उघडण्याची अनेक हिंदू संघटनांची मागणी होती. यात जिल्हा कौंसिलचे माजी रतन लाल, एमएनए रमेश कुमार कुमार बंकवानी हे प्रमुख आहेत. डिप्टी सेक्रेटरी हिंदू अफेअर्स, एक्यू ट्रस्ट प्रापर्टी बोर्ड फराज अब्बासने दैनिक भास्करला सांगितले की, हा निर्णय हिंदूंची मागणी आणि शिवालाच्या महत्त्वाकडे पाहून करण्यात आला आहे.


पाक सरकार शिवालाच्या संरक्षणासाठी 50 लाख रुपये खर्च करणार. बोर्डाचे चेयरमॅन डॉ.आमीर अहमदने याच्या जिर्णोधाराचे काम लवकर सुरू होईल असे सांगितले. बॉम्ब ब्लास्टमध्ये वाचलेले भाग अजून सुरक्षित आहे. मंदिराचे छत, गुफा आणि इतर लहान-मोठी कामे आहेत. श्री गंगा राम हेरिटेज फाउंडेशनचे डायरेक्टर सैयद शाहीन हसनने सांगितले की, अनेक लोक याच्या जिर्णोधारासाठी मदत करतील.

शिवालाचे निर्माण 1000 वर्षांपूर्वी, म्हणजेच 10व्या शतकात झाले होते. या शतकातच खजुराहोसहित दक्षिण भारतातातील अनेक मंदिरांना बनवणे सुरू होते. शिवाला तेजा सिंहवर मंदिरवरही याच वास्तु कलेची छाप आहे. मंदिरावरचे नक्षीकाम अतिशय संदुर आहे. मंदिराच्या जिर्णोधारानंतर धार्मिकच नाही तर पर्यटन स्थळ म्हणूनही हे समोर येईल.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
1000 years old Shivala temple of Sialkot open after 72 years