एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही - अँड. शरद पोळ 

एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, असे शासनाचे धोरण आहे. यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी आपली मुले नजीकच्या शाळेत दाखल करून घ्यावीत.

एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही - अँड. शरद पोळ 
सर्व्हेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करताना अँड. शरद पोळ व इतर

एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही - अँड. शरद पोळ 

कराड/प्रतिनिधी : 

          प्रत्येक मुल शाळेत यावे याकरिता शासकीय पातळीवरून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे पालकांनी आपली मुले नजीकच्या शाळेत दाखल करून घ्यावीत, असे आवाहन कराड पंचायत समितिचे सदस्य अॅड. शरद पोळ यांनी केले. 

          वनश्रीनगर येथे शाळा बाह्य मुलांच्या सर्व्हेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ओंड गावच्या सरपंच मनीषा माने, केंद्रप्रमुख सदाशिव आमने, मुख्याध्यापिका शारदा माने, शोभा पोळ, राजेंद्र लादे, सचिन राजमाने, वसंत जाधव, प्रदीप रवलेकर, प्रतिभा पाटील, भारती यांची उपस्थिती होती. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा सेविका,  ग्रामस्थांची उपस्थिती होती.

           अँड. पोळ पुढे म्हणाले, एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, असे शासनाचे धोरण आहे. यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. २०१५ मध्ये महासर्वेक्षण झाले होते. त्यानंतर परत एकदा शाळाबाह्य मुलांचा शोध शिक्षण विभागाला घ्यायचा आहे. आपला तालुका शाळाबाह्य विद्यार्थी मुक्त कसा होईल, याकरिता सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. तेव्हा सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन राजमाने यांनी केले. तर आभार राजेंद्र लादे यांनी मानले.