'त्याचा' माग सीसीटीव्हीने काढला..... रुग्णवाहिकेतून उतरलेली 'ती' व्यक्ती गेली 'त्या' दिशेला

कोल्हापूर येथील कोरोना बाधित असणाऱ्या व्यक्तीसह सातारा ते कोल्हापूर जाणाऱ्या रुग्णवाहिकेतून प्रवास करणारा संशयीत व्यक्ती हा उंब्रज बस स्थानकावर उतरल्याची घटना समजल्यावर पोलिसांसह स्थानिक प्रशासन हादरून गेले होते.बुधवारी रात्री पासून या घटनेचे संदेश व रुग्णवाहिकेचा फोटो व्हाट्सएप,फेसबुक तसेच विविध प्रसार माध्यमातून व्हायरल होऊ लागल्याने उंब्रजकरांची चिंता वाढली होती,परंतु पोलीस प्रशासनने युद्धपातळीवर हालचाल करीत सीसीटीव्ही यंत्रणा चाळायला सुरुवात केल्याने धोका टाळता आला नसला तरी संशयित कोणत्या दिशेला गेला आहे त्या दृष्टीने शोध मोहीम राबवली आहे .

अनिल कदम/उंब्रज

याबाबत प्राथमिकदृष्ट्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी १.४५ च्या सुमारास संशयित इसम हा उंब्रज बस स्थानकासमोरून कराड बाजूला चालत जाऊन पाटणला जाणाऱ्या बोगद्यातून पाटण रोडला गेल्याची माहिती मिळत आहे .त्यानंतर पाच मिनिटाच्या फरकाने शुभम चित्र मंदिरासमोरून पाटण दिशेला गेल्याचे दिसत आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेमके २८ मार्च रोजी बोगदे बंद करून कळक बांधायचे चालले असल्याने सदरचा संशयित थेट पाटण रोड वरील बोगद्यात गेला होता कारण चोरे रोड आणि कॉलेज रोड वरील दोन्ही बोगदे वाहतुकी साठी बंद होते.यामुळे सदरचा इसम थेट पाटण बोगद्यातून चालत पाटण रोडला गेल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

आणीबाणीच्या परिस्थितीत संशयित व्यक्तीचा माग काढताना सीसीटीव्ही यंत्रणेची मोलाची मदत पोलीस प्रशासनाला झाली असून उंब्रज ग्रामपंचायतला सपोनि अजय गोरड यांनी केलेली सूचना व ग्रामपंचायतने दिलेला प्रतिसाद यामुळे संशयित इसमाचा माग काढणे सोपे गेले आहे.यामुळे सीसीटीव्ही यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित झाले असून सद्य स्थितीत 'त्या'संशयित इसमाचा शोध व त्याची दिशा शोधण्यासाठी उंब्रज पोलिसांनी परिसरात असलेले सर्वच कॅमेरे शूटिंग तपासणी चालू केली असुन संशयित इसमाचा शक्य आहे तिथं पर्यतचा प्रवास ट्रेस करणार असल्याचे समजले.