उत्तरेतील अवैद्य गौण खनिज उपसा कोणाच्या अधिपत्याखाली.!

कवठे सर्कल मधील कारवाई गुलदस्त्यातःमोठ्या तडजोडीचे वावटळ 

उत्तरेतील अवैद्य गौण खनिज उपसा कोणाच्या अधिपत्याखाली.!

उत्तरेतील अवैद्य गौण खनिज उपसा कोणाच्या अधिपत्याखाली.!


कवठे सर्कल मधील कारवाई गुलदस्त्यातःमोठ्या तडजोडीचे वावटळ 


कराड उत्तर विभागात सातत्याने अवैध गौण खनिज विभागात ज्या कारवाया होत आहेत त्या कायम चर्चेत असतात. येथील काही अण्णासाहेब जागेवरच अर्थपूर्ण व्यवहार करतात. अन्यथा रस्त्याने येताना वाहने सोडून देतात. असे प्रकार यापूर्वीपासून सातत्याने घडत आले आहेत. उंब्रज परिसरात जिल्ह्यातील वाळूला बंदी आहे. मात्र याठिकाणी रात्रीस खेळ चाले हा प्रकार पहायला मिळत आहे. हे कोणाच्या जीवावर सुरू आहे. याचा शोध जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांनी घ्यावा म्हणजे दुध का दुध...पाणी का पाणी समोर येईल जी रथी महारथी या ठिकाणी तळ ठोकून आहेत यांच्यावर प्रांताधिकारी कारवाई करणार का? तेच कराडच्या महसूल खात्याच्या प्रेमात पडणार अशी चर्चा रंगू लागली आहे. ज्यांनी जिलेटने बोटी उडवल्या ते या ठिकाणी गप्प आहेत. यामागचे कारण काय? हे त्यांनी बारामतीत केले ते कराडात करावे आणि वाळू, मुरूम व खान व्यवसायातील माफियांच्या मुसक्या आवळाव्यात मगच कराडकरांना समजेल की ज्यांनी बारामतीत केले ते येथेही होवू शकते हे त्यानंतरच सिद्ध होईल.


कवठे सर्कल विभागातील कारभार हा नेहमीच चर्चेत राहिला असून माहितीसाठी प्रभारी मंडलाधिकारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कायमच ’आऊट ऑफ रेंज’असल्याचा अनुभव येतो.तर कधीकाळी चुकूनमाकून संपर्क झालाच तर फोन उचलण्याचीही तस्ती संबंधित अधिकारी घेत नसल्याने वरकरणी झालेली कारवाई गुलदस्त्यात राहत असून माहितीची देवाणघेवाण होण्याचा संबंध येत नाही.मसूर सर्कल यांचेकडे कवठे सर्कलचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ’दुष्काळात...महिना’अशी गत झाली आहे.यामुळे कवठे सर्कल मधील कारवाई गुलदस्त्यात राहिली असून मोठ्या तडजोडीची वावटळ कवठे मंडलात चर्चेत आहे.


कालगाव गावच्या हद्दीत श्री’राम’ भरोसे असणार्‍या महसुली अधिकार्‍याने अवैध गौण खनिज उत्खनन करताना सापडलेली यंत्रणा ताब्यात न घेता अलगद सोडून दिल्याची चर्चा कालगाव, खराडे परिसरासह कवठे सर्कल मध्ये पसरली आहे.एक जेसीबी तसेच ट्रॅक्टर अशी मोठी दंड होऊ शकणारी वाहने ’त्या’अधिकार्‍याने सोडून दिल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर काही प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी दिली आहे.


कालगाव येथील दगड खाणीतील उत्खनन विषय चर्चेत असून कराड तहसील कार्यालयाची कवठे सर्कलवर कायमच मेहेरनजर असल्याची चर्चा आहे.अशातच एकाच महसूल अधिकार्‍यावर दोन महसूल सर्कलचा पदभार असल्याने कालगाव,खराडे येथील अवैध गौण खनिज उत्खनन जोमात झाले होते.कारण याठिकाणी महसुलचा कर्मचारीच कायमस्वरूपी नेमणुकीला नसल्याने प्रभारी कार्यभार असणार्‍या अधिकार्‍याला रान मोकळेच असल्याची चर्चा आहे.कृष्णा नदीकाठ असल्याने तसेच डोंगररांगा जवळ असल्याने कायमच याठिकाणी अवैध उत्खनन होत असते.त्यातच स्थानिक महसुली अधिकार्‍यांनीच पंचनामे करताना कायदेशीर त्रुटी ठेवल्या असता याचा फायदा अवैध उत्खनन करणारे उचलत असतात.


स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार कालगाव येथील क्रशरच्या बाबतीत तत्कालीन मंडल अधिकारी यांनी घोळ करून ठेवल्याची माहिती कालगाव येथील तक्रारदार  यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना भेटी दरम्यान सांगितली आहे.खाणीचे मोजमाप घेताना तसेच स्थळ पाहणी अहवाल देताना खाण मालकाला झुकते माप दिले असून महसुली अधिकार्‍यांच्या कचखाऊ वृत्तीमुळे आजअखेर कराड उत्तर मधील अनेक ठिकाणांच्या अवैध उत्खननात शासन महसुलाला लाखो रुपयांचा चुना लागला आहे.


सर्वसामान्य गोरगरीब कायद्याच्या कचाट्यात सापडला असता त्याला दंडात्मक कारवाई करणारा महसूल विभाग कालगाव येथील कारवाई बाबत मूग गिळून बसला असल्याने नागरिकांच्यात चर्चेला उधाण आले असून महसूल खात्या संदर्भात उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.याबाबत जिल्हाधिकारी अथवा प्रांताधिकारी कराड महसूल खात्याची भूमीक स्पष्ट करून कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी कवठेसह मसूर विभागातून होऊ लागली आहे.