उंब्रज ग्रामपंचायतीची हयगय....

ग्राम सुरक्षा समिती राहिली कागदावरच

उंब्रज ग्रामपंचायतीची हयगय....

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज ता.कराड येथे बुधवारी निदर्शनास आलेला कोरोनाबाधित रुग्ण ग्राम सुरक्षा समितीची पोलखोल करणारा ठरला आहे.पुणे मुंबई अथवा पर जिल्ह्यातील येणारे नागरिक होम क्वारणटाईन आहेत की नाही शिक्के मारले आहेत ते घरीच थांबतात का बाहेर जनतेत मिसळतात याचा थांगपत्ता कोणालाही लागत नसून"जनता रस्त्यावर तर पंचायत केबिन मध्ये" अशी अवस्था झाली असल्याची जनतेत चर्चा आहे.कोरोना बाधित रुग्ण सापडल्यावर तेवढ्या पुरते कार्य तत्परता दाखवणाऱ्या प्रशासनाचा बुरखा या घटनेमुळे फाटला आहे.

उंब्रज ता.कराड येथील पाटील गल्ली परिसरातील एका २६ वर्षीय युवकाचे रिपोर्ट कोरोना पाँझिटीव्ह आल्याने उंब्रजकरांच्या धास्तीत वाढ झाली आहे. दरम्यान रिपोर्ट पाँझिटीव्ह आल्यानंतर उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांच्यासह पथकाने या परिसरात धाव घेवून उपाययोजनांना सुरुवात केली आहे. याबाबत डॉ. कुंभार यांनी सांगितले की, सदरचा युवक २१ जुन रोजी  मुंबई प्रवास करुन उंब्रज येथे आला आहे. तापाची लक्षणे असल्याने २२ रोजी उंब्रज आरोग्य केंद्रातुन औषधे देण्यात आली पंरतु ताप कमी येत नसल्यामुळे तपासणीसाठी कृष्णा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याठिकाणी सदर युवकाचे स्वँब तपासणीसाठी घेण्यात आले. गुरुवारी सायंकाळी तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन सदर युवकास कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान सदर युवकासोबत स्वीप्ट कारमधून कुंटूबांतील एक पुरुष, एक महिला व दोन लहान मुले आली आहेत.  त्यापैकी एकजन पुन्हा मुंबईला परत गेला आहे. सध्यस्थितीत या.युवकाच्या संपर्कातील पाच.जणांना क्कांरनटाईन करण्यात आले आहे. 

यापुर्वी उंब्रज येथे पाचजणांना कोरोना झाला होता पंरतु हे पाचही रुग्ण कोरोना मुक्त होवून सुखरूप आहेत. त्यांमुळे ग्रामस्थांसह आरोग्य विभाग, पोलीस, प्रशासन यांना दिलासा मिळाला होता पंरतु पुन्हा रुग्ण सापडल्याने उंब्रजकरांची धास्ती वाढली असून खबरदारी घेण्याची वेळ निर्माण झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डाँ संजय कुंभार यांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर पळापळ

कोरोना बाधित रुग्ण सापडल्यावर पळापळ करणाऱ्या प्रशासनाने परगाववहून कोणकोण आले आहे यांची माहिती घेऊन ते घरातच आहेत की जनतेत फिरत आहेत याची शहानिशा करणे गरजेचे आहे.नाहीतर हाय रिस्क मधील आकडे वाढत जाऊन कोरोना बाधित रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जंगी "पार्टीला" कोण कोण

एकूण १५ पेक्षा जास्त लोक हाय व लो रिस्क मध्ये असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजत असून त्या जंगी पार्टीला कोण कोण होते याची माहिती घेऊन संपर्कातील सर्वजण लो रिस्क मध्ये असल्याचे सांगितले