सोलापूरच्या माळशिरस मध्ये पोलीसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

सोलापूरच्या माळशिरस मध्ये पोलीसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

सोलापूर/ महेश गायकवाड
सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील माळशिरस तालुक्यातील वेळापुर पोलीस ठाणेतील पोलीस नाईक जावेद जमादार हे 
मळोली या गावात  घालत  पेट्रोलिंग करत गस्त घालत असताना  एक हॉटेल उघडे दिसले ते हॉटेल बंद करा म्हणून सांगितले असता  जमादार यांच्या अंगावर ब्लेड चे जबर वार करून त्यांना जबर मारहाण ही करण्यात आली. ही घटना मळोली गावांमध्ये रात्री घडली असून पोलीस नाईक जमादार यांना जबर मारहाण ही करण्यात आली आहे.  पोलीस नाईक जमादार यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवुन देण्याचा व त्यांच्या खुनाचा ही प्रयत्न झाला आहे. 
यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे सध्या मळोली गावांत वातावरण शांत असले तरी तणाव वाढला असून पोलीस फोर्स मागविण्यात आला आहे दरम्यान एका व्यक्तीला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून इतरांचा शोध सुरू आहे.