सोनाराला मोक्का उंब्रज पोलिसांचा दणका

चोरट्यांसह चोरीचे सोने घेणाऱ्या १३ जणांना जेलची हवा

सोनाराला मोक्का उंब्रज पोलिसांचा दणका

अनिल कदम  /उंब्रज

सोने चोरीच्या गुन्ह्यांचा तपास कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून उंब्रज ता.कराड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांचे नाव घ्यावे लागेल.जबरी अथवा धाडशी दरोड्याच्या तपासाची दिशा ठरविताना तसेच मुद्देमाल हस्तगत करताना अनंत अडचणी निर्माण होत असतात. अतिशय कौशल्याने तपास करीत सोनाराला मोक्का सारख्या गंभीर शिक्षेला पात्र केल्याने चोरट्यांसह चोरीचे सोने घेणाऱ्या सोनारांवर पोलिसांचा जबरदस्त वचक निर्माण केला आहे.१३ जणांना मोक्का लागल्याने एका मोठ्या टोळीला लगाम लावण्यात उंब्रज पोलिसांना यश आले असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

 

सराईत आणि कायद्याची भीती नसलेले अट्टल गुन्हेगार नेहमीच कायद्यातील पळवाटांचा आधार घेत पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात वाकबगार होते.लाखो रुपयांचा ऐवज प्रसंगी गंभीर मारहाण करून लुटून न्यायचा ओळखीचा सोनार गाठून कवडीमोल किमतीला विकायचा मौजमजा करायची पैसे संपले की पुन्हा लूटमार करण्याची सवय जडलेले गुन्हेगार आणि अल्पदरात बहुमोल सोने घ्यायची सवय लागलेले सोनार याची साखळी समाजासाठी डोकेदुखी ठरलेली असताना उंब्रज पोलिसांनी मोक्काची केलेली कारवाई आणि वरिष्ठ पातळीवर केलेला पाठपुरावा राज्यातील अधिकाऱ्यांना दिशादर्शक ठरणार असून यामुळे चोरीच्या गुन्ह्यांना निश्चितच आळा बसेल

 

उंब्रज पोलिसांनी जबर दुखापतीसह दरोडा घालणा-या नगर व बीड आंतरजिल्द्यातील टोळीला मोक्काची प्रक्रिया केली असून सपोनि गोरड यांच्या कार्यकाळात तिसरा मोक्का लागला आहे.यामध्ये दरोडयातील सोने घेणारा सोनाराचाही समावेश आहे.उंब्रज पोलीस ठाणे हृ्दीतील मसूर या मोठी बाजारपेठ असलेल्या संपन्न गांवास लक्ष करुन गत काही महीन्यांमध्ये घर फोड़ी, जबरी चोरी, दरोडे बेमालूमपणे वाढले होते दि. ०२ मार्च २०२२ रोजीचे मध्यरात्री डॉ. संपते वारे यांचे बंगल्याचे दार कटावणीने आतील कड़ी उचकट्न डॉक्टर दांपत्यास हत्याराने जबरी मारहाण तसेच घरातील लोकांना जीवे मारण्याची दमदाटी देत हत्याराने दहशत निर्माण करून जबरीने चाव्या घेवुन अंगावरील सोन्यांचांदीचे दागीने, रोख रक्कम असा किं. रु. ५ लाख नऊ  हजार पाचशे रूपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरल्याची फिर्याद दिली होती यावेळी गुन्ह्याची खबर मिळताच सपोनि अजय गोरड व पोलीस पथक घटनास्थळी तातडीने हजर राहून वरिष्ठांच्या आदेशाने मसुर व लगतचे गांवांसह तालुक्यात, जिल्ह्यात शोधपथके पाठविली. स्वतः तपास केला.यामधील ५ आरोपी स्था.गु.शा. सातारा यांनी निष्पन्न केलेले व त्यांनी मसुर येथील दरोडयाची कबुली दिलेली असलेने त्यांना वर्ग करुन ताबा घेवून अटक करुन त्यांचेकड्न गुन्ह्यातील गेले मालापैकी काही अंशी माल हस्तगत करुन आरोपीत हे टोळी केला होता. 

टोळीने गुन्हे करण्यारे तरबेज व सराईत, धाडशी व कुख्यात गुन्हेगार सक्रिय असलेबाबत निष्पन्न झालेने तसेच त्यांचे इतर साथीदार व त्यांचा चोरीचा माल घेवुन गडगंज झालेले सोनार, आरोपीचे नातेवाईक यांनी गुन्ह्यातील चोरीचा माल घेवून अप्रत्यक्ष गुन्ह्यास व गुन्हेगांराना मदत केल्याचे निष्पन्न झालेने त्यांनाही सहआरोपी केले होते.सदर गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींकड्न सोन्याचांदीचे दागीने चोरीचे असल्याचे माहीती असतानाही घेणारे सोनारांचा समावेश आरोपी मध्ये करुन त्यांना मोक्का लोावणेची महत्वपूर्ण कार्मगिरी अजय गोरड व उंब्रज पोलीस स्टेशन टीमने केलेली आहे

 

गोर गरीब निष्पाप नागरिकांचे आयुष्याची कमाई एका झटक्यात जबर मारहाण,ज़ायबंदी करुन,सहकार्याने बेमालूमपणे मालमत्तेचे गुन्हें करीत दरोडे टाकणारी टोळी दरोडा टाकुन चोरलेल्या सोन्याचांदीचे दागीने विकणारे व विकत घेणारे (सोनार) अशा आरोपीची संघटीत टोळी निष्पन्न करन टोळीप्रमुख

होमराज उर्फ होम्या उध्दव काळे, वय- ३१ वर्ष, रा. वाको शिवार ता. आष्टी जि बीड़

 अजय उर्फ आज्या सुभाष भोसले, वय- २३ वर्ष, रा, माहीजळगांव ता. कजेत जि. अहमदनगर,

 सचिन ऊर्फ आसी सुभाष भोसले, वय- २४ वर्ष, रा, माहीजळगांव ता. कर्जत जि. अहमदनगर,

 अविनाश उर्फ आवी ऊर्फ महिंदा सी सभाष कर्जत  जि. अहमदनगर ,

 सौ  सुनीता होमराज काळे 

अतुल लायलन भोसले रा, आष्टी ता. जि. बीड,

धल्ल्या उ्फ धर्मेद्र ननश्या काळे रा.স बीड.

कानिफनाथ उध्दव काळे रा. वाकी ता आष्टी

 गणेश उर्फ बन्सी रीगिशा काळे रा.कथत

संतोष विनायक पंडीत, सुवर्णकार,

निलेश संतोष पंडीत, सुवर्णकार

अ. नं. ११ व १२ रा. লাगল्ली, आरणगांव ता. जि. अहमदनगर हल्ली माहीजळगांव ता. कर्जत जि. अहमदनगर व १२) सा.) रा. बाका शिवार ता. आष्टी जि.बीड, या लोकांविरुध्द मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करणेते आली आहे.

या टोळीतील आरोपींनी संघटीतपणे, स्वतः:चे व टोळीतील सदस्यांचे आर्थिक फायद्याकरीता सातारा जिल्ह्यातील उब्रज,औध, वडुज सह महाराष्ट्रातील पूणे,बीड,अहमदनगर, आदी जिल्ह्यातील विविध पो. स्टे. हद्दीत दहशतीने दरोडे घालुन लोकांना जबर मारहाण करुन त्यांचेकडील सोन्याचांदीचे दागीन्यांसह रोख रक्कम जबरीनि चोरी केले बाबत गुन्हें दाखल आहेत.गुन्ह्यामध्ये मोक्का प्रस्ताव मंजूरी करीता पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल,अजित बो-हाडे अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. रणजीत पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी कराड, पोलीस निरीक्षक स्थागुशा,सातारा किशोर धुमाळ,अजयं गोरड,सपोनि.,पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, सहा.पोलीस उपनिरीक्षक संजय देवकुळे, पो.कॉ. श्रीधर माने उंब्रज पो. स्टे.यांनी मोक्का प्रस्ताव मंजुरीकरीता सहभाग घेतला आहे.