उंब्रजच्या ११३ दिव्यांगाना मदतीचा हात, दिव्यांग संघटना व पोलीसांची मदत

उंब्रजच्या ११३ दिव्यांगाना मदतीचा हात, दिव्यांग संघटना व पोलीसांची मदत
उंब्रज येथे दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तूंचे.किट वाटप करताना सपोनि अजय गोरड,डॉ.संजय कुंभार यांच्यासह अन्य

उंब्रज / प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली दिड महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने येथील दिव्यांग संघटना व पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल डिस्टंनस राखून गरजू ११३ जणांना जीवनावश्यक किटसह सँनिटायजर, मास्कचे वाटप करण्यात आले.

 

येथील पोलीस ठाणे आवारात दिव्यांग संघटना व पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधव,महिला यांना धान्यासह जीवनावश्यक वस्तू तसेच सँनिटायजर, मास्कचे वाटप वैद्यकीय अधिकारी संजय कुंभार, सपोनि अजय गोरड,पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी डॉक्टर संजय कुंभार म्हणाले, दिव्यांग लोकांनी या लॉकडाऊनच्या कालावधीत स्वतः ची काळजी घेणेचे गरजेचे आहे.काही लक्षणे दिसल्यास संपर्क साधा.कमजोर तसेच ज्यांना  जुना आजार आहे अशा लोकांनी घराच्या बाहेर पडू नका.काही आवश्यकता असल्यास येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधा असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी शरद साळुंखे, रमेश जाधव, दिपक खडंग,सागर स्वामी, दिगंबर भांद्रिगे,प्रमोद गायकवाड, अनिल आटोळे,काळभोर मँडम यासह दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.